शाहरुखचा डुप्लिकेट पाहून सलमान खानला आवरेना हसू; व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग किती मोठा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. अनेकादा अभिनेत्याचं मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. चाहते अभिनेत्याचं मन जिंकण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही.

Updated: Nov 28, 2023, 03:01 PM IST
शाहरुखचा डुप्लिकेट पाहून सलमान खानला आवरेना हसू; व्हिडीओ होतोय व्हायरल title=

मुंबई :  अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग किती मोठा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. अनेकादा अभिनेत्याचं मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. चाहते अभिनेत्याचं मन जिंकण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. तर अनेकदा आपण सेलिब्रिटींच्या ड्युप्लिकेट्स्ला पाहिलंच असेलं. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या ड्युप्लिकेटबद्दल बोलत आहोत त्याला पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की ही व्यक्ती एका नामांकित अभिनेत्याची डुब्लिकेट आहे. मात्र समोर येणाऱ्या एका व्हिडीओमध्ये शाहरुखची डुप्लिकेट दिसत आहे. मात्र या व्यक्तीला पाहून त्याला ट्रोल करत आहेत. 

कारण युजर्सचं असं म्हणणं आहे की, स्वत:ला शाहरुखचा डुप्लिकेट म्हणणारा व्यक्ती दूर-दूरपर्यंत त्याच्यासारखा दिसत नाही. भलेही त्याची हेअरस्टाईल तशी असली तरी तो शाहरुखसारखा दिसत नाही असं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. मात्र तुम्हाला हे सगळं ऐकून विचीत्र वाटलं असेल ना. तर आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण शाहरुखचा डुप्लिकेट नुकताच सलमानच्या राहत्या घरी त्याला भेटण्यासाठी गेला होता. त्याला पाहून त्याच्या डोळ्यांवरही त्याला विश्वास बसत नव्हता. 
 
सलमानने त्याला पाहताच तो गोंधळात पडला. यानंतर त्याने डायलॉग बोलायला जेव्हा सुरु केले तेव्हा सलमानला हसू फुटलं. जसा सलमान या व्यक्तीला भेटला तेव्हा त्या व्यक्तीने व्हिडीओ बनवणं सुरु केलं. पठान एंड टाइगर इज हेयर... असं म्हणाला मात्र याचा काहीच ताळमेळ लागत नव्हता. यानंतर हे ऐकून सलमानलाही हसू आवरत नव्हतं. यानंतर तो पुन्हा प्रयत्न करतो मात्र सलमान आपलं हसू शांबवू शकत नव्हता. ज्यामुळे ती व्यक्ती तिथे पोहचली होती ते तर तो करु शकला नाही मात्र त्याच्या येण्याने सगळ्यांच एंटरटेन्मेंट तर नक्कीच झालं यात काहीच शंका नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर मजेदार कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने सलमान ओरिजनल आहे का?  तर अजून एकाने लिहीलंय, पठान नहीं थकान है. तर अजून एकाने म्हटलंय, याला पाहून मला सलमानही नकली वाटू लागलाय. तर अजून एकाने लिहीलंय, सलमान खान सोबत नकली शाहरुख खान. तर अजून एकाने म्हटलंय, करण अर्जून is here. तर अजून एकाने म्हटलंय, शाहरुख येवून मारेल जर तु असं वागलास तर. अजून एकाने लिहीलंय, सलमान स्वत: हसतोय पठाणवर. तर अशा अनेकप्रकारच्या कमेंट युजर्स या व्यक्तीचा आणि सलमानच्या व्हिडीओवर करत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा कॉमेडी व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.