VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालीय. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात कंगना झाशीची झुंझार महाराणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे कंगनाचा अवतारही शाही झालाय. 'मणिकर्णिका'चा ट्रेलर समोर आल्यानंतर तो काही वेळेतच व्हायरल झाला होता... आता या सिनेमाचं पहिलं गाणं 'विजयी भव' प्रदर्शित झालंय. हे गाणंही प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभं करण्यासाठी पुरेसं ठरतंय. कंगनाचा शानदार आणि दमदार अवतार या छोट्याशा व्हिडिओत पाहायला मिळतोय. 

कंगना रानौत
कंगना रानौत

येत्या २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बुधवारी सायंकाळी या सिनेमाचा म्युझिक लॉन्च कार्यक्रम पार पडला. इथे सिनेमातलं पहिलं गाणं 'विजयी भव' प्रदर्शित करण्यात आलं. 

या गाण्यात कंगना एका योद्ध्याच्या रुपात दिसतेय. आपल्या झाशीला वाचविण्यासाठी महिला योद्ध्यांना तयार करताना कंगना या गाण्यात दिसतेय. 

कंगनासोबत या व्हिडिओत झलकारी बाईच्या भूमिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडेही दिसणार आहे. तिच्यासोबत अनुभवी अभिनेते डॅनीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 

'विजय भव' हे गाणं शंकर एहसान लॉय यांनी कंपोज केलंय तर शंकर महादेवन यांनी या गाण्याला आपला आवाज दिलाय. प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी 'विजयी भव'चे शब्द लिहिलेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा हिंदी आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगनाशिवाय अतुल कुलकर्णी, जिशु सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी तसंच अंकिता लोखंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
kangana ranaut is ready to teach about valour and patriotism in her victory anthem watch video
News Source: 
Home Title: 

VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील

VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, January 10, 2019 - 16:19