Hollywood Actor and His Wife Found Dead at Home : ऑस्कर विजेता अभिनेता जीन हॅकमॅन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा हे त्यांच्या घरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडलेत. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या श्वानाचा मृतदेह देखील सापडला आहे. ही माहिती सांता फेच्या एका शेरीफनं दिली आहे.
'द गार्डियन' च्या रिपोर्टनुसार, 95 वर्षईय Gene Hackman आणि त्यांची 63 वर्षीय क्लासिकल पियानिस्ट पत्नी बेट्सी अराकावा काल बुधवारी 26 फेब्रुवारी दुपारी आपल्या घरात मृताअवस्थेत आढळले. सांता फेनं पोलिसांना याची माहिती दिली. तर प्रेस असोसिएशननं सांगितलं की या प्रकरणात तपास सुरु आहे. त्यावर शेरिफ मेंडोजा यांनी सांगितलं की अजून या प्रकरणात काही गडबड किंवा काही संशयास्पद असं समोर आलेलं नाही. त्यासोबत हे देखील कळलं नाही की जीन हॅकमॅन आणि त्यांच्या पत्नीचं निधन कधी आणि कसं झालं हे कळलेलं नाही.
शेरिफचे प्रतिनिधी बुधवारी दुपारी जीन हॅकमॅन, त्यांची पत्नी आणि श्वानाचा संशयास्पद निधन कसा झाला याचा शोध घेण्यासाछी ओल्ड सनसेट ट्रेलमध्ये असलेल्या त्यांच्या घरी पोहोचले. शेरिफनं सांगितलं की मी फक्त इतकं सांगू शकतो की आता त्याच्या मृत्यूचं कारण शोधत आहोत आणि सर्च वॉरन्ट मिळण्याची प्रतीक्षा करत आहोत. माझी संपूर्ण कम्युनिटी आणि जवळपास असलेल्या लोकांना हे सांगू इच्छितो की कोणालाही सध्या कोणालाही कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
जीन हॅकमॅननं पत्नीसोबत न्यू मॅक्सिकोतील सांता फे मध्ये1980 पासून राहत होते. त्यांनी 1991 मध्ये बेट्सी अराकावाशी लग्न केलं. जीन यांचं दोन वेळा लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुलं होते. त्यांचं पहिलं लग्न हे Faye Maltese यांच्याशी झालं होतं. त्यांचा हा संसार 30 वर्ष टिकला. त्यानंतर त्यांनी 1991 मध्ये बेट्सी अराकावाशी लग्न केलं.
हेही वाचा : ...म्हणून 'छावा'मध्ये साकारली नकारात्मक भूमिका; सारंग म्हणाला, 'लोक मला मारायला...'
जीन हॅकमॅन हे त्यांची पत्नी बेट्सी अराकावासोबत राहत होते. तर जीन हॅकमॅन यांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर त्यांनी जवळपास 40 वर्ष चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी द फ्रेन्च कनेक्शन', 'सुपरमॅन' आणि The Royal Tenenbaums सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांची स्तुती करण्यात आली. 2004 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला. जीन हॅकमॅन यांनी 1964 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.