Govinda's Love Life : बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र, गेल्या काही काळापासून त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याचं खासगी आयुष्य आहे. गोविंदाच्या लव्ह लाईफविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. गोविंदानं सुनितानं लग्न केलंय पण तुम्हाला माहितीये का की त्याला सुनितासोबतचा साखरपुडा मोडून या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं आणि त्यासाठी तो तयारही झाला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण? चला तर जाणून घेऊयात कारण कधी स्वत: गोविंदानं याविषयी सांगितलं होतं.
गोविंदाविषयी बोलायचं झालं तर 'लव्ह 86' या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. काही वर्षांमध्ये तो मोठा अभिनेता झाला. त्यानं 90 चं दशक गाजवलं. त्यानंतर अचानक त्याची आणि सुनिताची भेट झाली आणि त्यांचं नात हे खुलू लागलं. आता रिलेशनशिपमध्ये असले तरी त्यांनी त्यांचं नात हे सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचं लग्न झालं हे देखील त्यांनी कोणाला कळू दिलं नव्हतं. आता हे सगळं जवळपास 1 वर्ष सुरु होतं.
सुनिताशी लग्न केल्यानंतर गोविंदाला अभिनेत्री निलमशी प्रेम झालं. त्याचं कारण म्हणजे निलम आणि गोविंदा हे अनेक चित्रपटांमध्ये एक काम करत होते. सतत एकमेकांसोबत राहू लागल्यामुळे गोविंदाला निलमवर प्रेम झालं. याविषयी गोविंदानं एका मुलाखतीत कबूली दिली होती. गोविंदानं 1990 साली 'स्टारडस्ट'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सांगितलं. जेव्हा गोविंदानं सुनितासोबतचा साखरपुडा मोडला होता. कारण त्याला निलमशी लग्न करायचं होतं. त्यानं सांगितलं होतं की तो निलमचा खूप विचार करायचा. आम्ही दोघे वेगवेगळ्या विचारांच्या कुटुंबातून येत होतो. मात्र, सगळं काही बाजूला करुण मी तिच्याशी बोलू लागलो. माझं मन तिच्याजवळ मोकळं करु लागलो.
गोविंदा एका मुलाखतीत म्हणाला की 'सुनिता आणि मी एकमेकांचे मित्र झालो. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. अनेकदा भेटायचो आणि प्रत्येक भेटीनंतर आणखी जाणून घेऊ लागलो आणि तशी ती मला आवडू लागली. निलम इतकी प्रेमळ आहे की कोणताही पुरुष तिच्या प्रेमात वेडा होईल. माझ पण तेच झालं. मी माझं सगळंकाही तिला देऊन बसलो होतो. '
पुढे याविषयी सविस्तर सांगत गोविंदा म्हणाला, 'निलमच्या प्रेमात असल्याचं सुनिताला जाणवल्यामुळे गोविंदामध्ये आणि सुनितामध्ये भांडण होऊ लागलं. मी सुनिताला मला सोडून जा असं सांगितलं. इतकंच नाही तर मी तिच्यासोबत साखरपुडाही मोडला. मात्र, पाच दिवसांनंतर सुनिताने मला कॉल केला नसता आणि नात्याबद्दल समजावलं नसतं तर मी निलमशी लग्न केलं असतं. मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्यात काही चूक आहे असं मला वाटलं नाही.'
हेही वाचा : शाहरुखचा मुलगा अबरामनं गिटार वाजवत गायलं Die With A Smile गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतूक
दरम्यान, नंतर गोविंदाच्या लक्षात आलं की 'निलमला त्याच्याशी लग्न करण्यात काहीही रस नाही आणि तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिला (निलमला) हुशार, छान दिसणारा पुरुष नवरा म्हणून हवा होता. मात्र, मी तसा नव्हतो. ती उच्चभ्रू कुटुंबातून होती. मी गावातील मध्यम वर्गीय कुटुंबातून होतो. आम्ही दोघे दोन टोकांवर होतो असं म्हणता येईल. विवाहित जोडपं म्हणून आम्ही कधीच यशस्वी ठरलो नसतो. निलमला याची जाणीव माझ्या आधी झाली असावी.'