Chhaava Movie Sarang Sathaye : लोकप्रिय अभिनेता आणि 'भाडिपा' चा संस्थापक सारंग साठ्येनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकताच तो 'छावा' चित्रपटात दिसला. या चित्रपटात सारंगनं गणोची ही भूमिका साकारली आहे. तर गणोची या नकारात्मक भूमिकेत सारंग दिसला आहे. त्याच्यासोबत आणखी एक नकारात्मक भूमिका पाहायला मिळाली ती म्हणजे कान्होजी ही. कान्होजी ही भूमिका अभिनेता सुव्रत जोशीनं साकाराली आहे. चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांनी त्या दोघांची भूमिका पाहिल्यानंतर त्यांच्यावर द्वेष आणला आहे. त्यानंतर काय झालं आणि त्याकडे सारंग कसं बघतो याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
सारंगनं 'एनडीटीव्ही मराठी'ला ही मुलाखत दिली आहे. यावेळी सारंग साठ्येला त्याची गणोजी भूमिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला याविषयी विचारण्यात आलं. तर यावर उत्तर देत सारंग म्हणाला, 'प्रेक्षक मला मारायला निघालेत. त्यामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिसादावर फारसं बोलणार नाही. मुळात त्यांचं ही बरोबर आहे. खरंतर ही काही साधी गोष्ट नाही. त्या भूमिकेनं जे काही केलं त्यानं स्वराज्याला तडा गेला. त्यामुळेच त्यांचा राग मी स्वीकारायला हवा.'
त्याच्या भूमिकेविषयी बोलताना सारंग पुढे म्हणाला, लक्ष्मण सरांनी आम्हाला या चित्रपटात घेण्याचं कारण म्हणजे त्यांना असं वाटतं होतं की दोन असेल कलाकार जे इतर वेळी चांगल्या भूमिका साकारतात ज्या प्रेक्षकांच्या मनात चांगली छाप सोडून गेल्या आहेत. ज्यांनी कधीही नकारात्मक भूमिका केली नाही. त्याचं कारण म्हणजे अशा दोघांनी या नकारात्मक भूमिका केल्या तर ही शक्यता आहे की ते कदाचित लोकांना समजणारच नाही की पुढे काय होणार. त्यामुळे नंतर ते त्यांच्या मनाला लागेल. त्यामुळे लक्ष्मण सरांनी आम्हाला कास्ट केलं. आम्हाला सतत वाटत होतं की सरांना माहित होतं की हे नीट होणार आणि त्यामुळेच याचं सगळं श्रेय हे त्यांनाच आहे.'
हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर धर्म बदलला? म्हणाली - 'मी त्याच्या नियाजला बसले आणि...'
दरम्यान, या भूमिकांवरून गणोजी-कान्होजी शिर्केंचे वंशज हे चित्रपटावर आक्षेत घेताना दिसले. त्यांचं कारण म्हणजे या दोन्ही भूमिका या मुघलांना मदत करत असल्याचं दाखवण्यात आलं. तर त्यांच्या कुटुंबाकडून होत असलेला विरोध पाहता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी स्पष्टीकरण देत त्यांची माफी मागितली होती.