'छावा' चित्रपटातील डिलीटेड सीन तुफान व्हायरल, अंगावर शहारे आणणारी दृश्य

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. अशातच आता या चित्रपटातील डिलीट करण्यात आलेला सीन सध्या व्हायरल झालाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 27, 2025, 06:22 PM IST
'छावा' चित्रपटातील डिलीटेड सीन तुफान व्हायरल, अंगावर शहारे आणणारी दृश्य

Chhaava Deleted Scene : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवसापासून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर 'छावा' चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मात्र, आता 'छावा' चित्रपटातील डिलीट करण्यात आलेला सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

'छावा' प्रदर्शित होण्यापूर्वी काही दृश्यांवरून झाला होता वाद

'छावा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला होता. चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यामधील एका सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. ज्यामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवण्यात आले होते. या सीनला विरोध झाल्यानंतर दिग्दर्शकांनी तो सीन डिलीट केला होता. मात्र, सध्या तो सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिलीट करण्यात आलेला सीन हा हंबीरराव मोहिते आणि सोयराबाई यांच्यातील आहे. ज्यामध्ये सोयराबाईंना राजाराम महाराज यांना छत्रपती करायचं आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यावेळी हंबीरराव मोहिते त्यांना काय म्हणतात? असा सीन होता. दिव्या दत्ता आणि अभिनेता आशुतोष राणा यांच्यामधील हा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

व्हायरल झालेल्या सीनमध्ये काय? 

व्हायरल होत असलेल्या सीनमध्ये छत्रपती संभाजी राजे हे औरंगजेबाचा मुलगा अकबरला भेटायला जातात त्यावेळी त्यांना सोयराबाई यांच्या कटकारस्थानांबाबत माहिती मिळते. त्यानंतर संभाजी राजे यांना दु:ख होतं. त्यानंतर सरसेनापती हंबीरराव म्हणजेच सोयराबाई यांचे भाऊ यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हंबीरराव सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण देखील करून दिली. त्यांच्या मनात त्यांनी जे ध्येय बाळगले आहे त्यावर पुर्नविचार करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. हाच संवाद व्हायरल होणाऱ्या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे. सध्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.