नागराज मंजुळेच्या सिनेमात दिसणार बिग बी

मुंबई : आधी फँड्री आणि त्यानंतर सुपरहिट सैराट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन असल्याची चर्चा आहे.

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाचे यश इतके मोठे होते की बॉलीवूडमध्येही याची दखल घेतली गेली. अनेक भाषांमध्येही याचे रिमेक करण्यात आले.

बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहरने तर या सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याचे ठरवलेय. त्यासाठीचे त्याने हक्कही घेतलेत. या अमाप यशानंतर नागराज बॉली़वू़डमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालेत. गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम कथानकावर सुरु करण्यात आलंय. त्यामुळे नागराज यांच्या आगामी सिनेमात अमिताभ बच्चन यांची काय भूमिका असेल, कसा असेल हा सिनेमा याबाबत अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसह नागराजच्या चाहत्यांनाही तितकीच उत्सुकता आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
big b will be seen in nagraj manjule
News Source: 
Home Title: 

नागराज मंजुळेच्या सिनेमात दिसणार बिग बी

नागराज मंजुळेच्या सिनेमात दिसणार बिग बी
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes