आश्रम सीझन 3 चा दुसरा भाग कधी येणार? तारीख ठरली! येथे पाहता येणार अगदी मोफत

बॉबी देओलच्या आश्रम सीझन 3 च्या दुसऱ्या भागाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. लवकरच चाहत्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 26, 2025, 06:00 PM IST
आश्रम सीझन 3 चा दुसरा भाग कधी येणार? तारीख ठरली! येथे पाहता येणार अगदी मोफत

Aashram Season 3 Part 2 Release: बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षीत वेब सीरिज 'आश्रम' 3 च्या दुसऱ्या भागाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशातच आता चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. निराला बाबा या भागात काय करतात हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. जेव्हा पासून 'आश्रम' 3 च्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. तेव्हापासून चाहत्यांना या वेब सीरिजबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. अशातच आता काही तासांमध्येच या वेब सीरिजच्या दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 

कुठे आणि कधी प्रदर्शित होणार? 

बॉबी देओलच्या 'आश्रम' 3 चा दुसरा भाग  27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज 26 फेब्रुवारी रोजी रात्री प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ही सीरिज बुधवारी रात्री म्हणजेच आज रात्री 12 वाजल्यापासून तुम्ही पाहू शकता.

'आश्रम' सीझन 3 चा दुसरा भाग प्राइम व्हिडीओ आणि एमएक्स प्लेयर या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. जर तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचे सबसक्रिप्शन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ही सीरिज पाहू शकता. जर तुमच्याकडे सबसक्रिप्शन नसेल तर तुम्ही ही सीरिज एमएक्स प्लेयरवर 'आश्रम' सीझन 3 चा दुसरा भाग तुम्ही मोफत पाहू शकता. 

'आश्रम' 3 च्या दुसऱ्या भागातील कलाकार 

'आश्रम' 3 च्या दुसऱ्या भागामधील कलाकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर यामध्ये जास्त करून सर्व जुने कलाकार आहेत. या सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओलसोबत त्रिधा चौधरी, अदिति पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, सचिन श्रॉफ, अनुरीता झा आणि राजीव सिद्धार्थ हे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

'आश्रम' 3 च्या दुसरा भाग हा खूपच खास असणार आहे. ज्यामध्ये पम्मी बदला घेण्यासाठी आश्रमात परत येते. ती कशी निराला बाबा आणि भोपा स्वामी यांना एकमेकांसमोर उभे करून न्यायासाठी काय काय करते हे आता पाहावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काही तास वाट पाहावी लागणार आहे. परंतु, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या भागाची कथा खूपच रंजक असणार असल्याचं म्हटलं जात आहे.